वजन माप व्यावसायिकांचे स्नेहसंमेलन
ठाणे, ता. ३१ (बातमीदार)ः महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेल्या ‘वेट्स अँड मेजर लायसेन्सी वेल्फेअर असोसिएशन’च्या कोकण विभागातील वजन माप उत्पादक, दुरुस्तक व विक्रेत्यांचे स्नेहसंमेलन आणि कार्यशाळा मंगळवारी (ता. ३) पनवेल येथे होणार आहे. या कार्यक्रमात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील वजन माप परवानाधारक सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या वैध मापनशास्त्र विभागाचा सक्रिय सहभाग असून, कोकण विभागाचे सहनियंत्रक शिवाजी काकडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपनियंत्रकही उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत वैध मापनशास्त्र अधिनियम २००९, अंमलबजावणी नियम २०११, व्यवसाय सुलभता, ऑनलाईन प्रणाली व शासनाच्या धोरणांविषयी परवानाधारकांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमातून व्यावसायिकांना शंका व अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कोकणातील सर्व वजन माप परवानाधारकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेचे सहसचिव आणि स्नेहसंमेलनाचे समन्वयक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.