भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक
तीन जणांना अटक
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर) :
अलिबागमधील एका भोंदूबाबाने पनवेल परिसरातील काही जणांना त्यांचे व्यवहारातील अडकलेले पैसे परत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले आणि त्यांच्याकडून लाखो रुपये लुटले. याप्रकरणी कळंबोली येथील गजानन कडव (वय ५५) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महेश मोरे (वय ५३), मिहिर मांजरेकर ऊर्फ मिहिर मोरे (वय २४), सागर कुंड (वय ३४), अपूर्वा महेश मोरे (वय ५०) यांना अटक करीत गुन्हा दाखल केला.
महेश मोरे व त्याच्या साथीदारांनी पनवेल तालुक्यातील कळंबोली परिसरातील गजानन कडव, नितीन पाटील, विघ्नेश सुर्वे यांच्यासह अन्य काही जणांना त्यांचे व्यवहारातील अडकलेले पैसे तसेच अनेक वर्षे प्रयत्न करूनही न होणारी कामे करून देतो, असे प्रलोभन दाखविले. गेल्या वर्षभरापासून गजानन कडव यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपये, नितीन पाटील यांच्याकडून एक लाख २९ हजार रुपये, विघ्नेश सुर्वे यांच्याकडून दोन लाख २५ हजार यासोबतच एक थार चारचाकी गाडी आणि एक जेसीबी घेऊन या तिघांसह इतरांचीही एकूण ४२ लाख चार हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गजानन कडव यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, अपूर्वा मोरे हिला जामीन मिळाला असून, इतर तिघांना ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.