मुंबई

घरकुल योजनेचे लाभार्थी उपेक्षित

CD

टोकावडे, ता. १ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यातील घरकुल योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना वेळेवर निधी वितरित होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महिनाभरापूर्वी संपूर्ण घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूही हप्ता वेळेवर मिळत नसल्याचे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घरकुल योजनेत लाभार्थ्यांनी वेळोवेळी आवश्यक कागदपत्रे सादर केली असून, शासनाकडून त्यांच्या खात्यावर हप्त्यांचे वाटप होण्यासाठी निधी मंजूर केला जातो. घरकुलाचे बांधकाम जसे पूर्ण होते त्यानुसार टप्प्याटप्प्यामध्ये निधी दिला जातो, परंतु काही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले तरी फोटो वेळेवर अपलोड केले जात नसल्याने लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याचे बोलले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून मुरबाड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. पावसात अनेकांचे संसार भिजले आहेत. त्यामुळे घरकुलाचा हप्ता वेळेवर पडला तरच लाभार्थी पुढील बांधकाम करू शकतो, मात्र हप्ते वेळेवर पडत नसल्याने अनेक घरकुल लाभार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.
----------------------------------------------------
बांधकामात अडथळे
गरजूंना त्यांच्या घरकुल बांधकामाची कामे पुढे नेण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हप्ते वेळेवर पडत नसल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची कामे पूर्ण करायची की घरकुलाचे काम पूर्ण करावे, अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी पडला आहे. काही घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर काहीचे काम थांबले आहे. आता आम्ही काय करायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. घरकुल मंजूर झाले असून, काही लाभार्थ्यांना पहिलाच हप्ता मला मिळाला आहे. घर जवळपास पूर्ण बांधून झाले आहे, परंतु हप्ते वेळेवर मिळत नसल्याचे लाभार्थी सांगतात.
-----------------------------------------------------
माझे घरकुल पूर्ण झाले आहे. तरी रोजगार हमीच्या माध्यमातून मिळणारी मजुरीही मिळाली नाही. तसेच घरकुलाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. अशातच पावसाळा तोंडावर आल्याने नुकसान होण्याची भीती आहे.
- दिनेश बेंढारी, घरकुल, लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

"मी काय करावे, हे मला कुणीही सांगू शकत नाही!" Sanju Samson चं धाडसी विधान; गौतम गंभीरला अप्रत्यक्ष इशारा? नेमकं काय म्हणाला?

'जळत्या सिगारेटचा चटका अन् वाटेल तिथं स्पर्श...' अभिनेत्रीनं सांगितला सर्वात वाईट अनुभव, म्हणाली...

Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

SCROLL FOR NEXT