मुंबई

ठाणेकरांच्या भावनांची थट्टा

CD

राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १ ः मानवी आयुष्यात अंत्यविधी हा भावनिक संस्कार असल्याने अस्थी विसर्जनासाठी पवित्र ठिकाणी जाण्याची प्रथा आहे, पण शहरात स्मशानातील अस्थी तसेच निर्माल्य कचराभूमीवर फेकत असल्याने ठाणेकरांच्या भावनांची पालिकेकडून थट्टा सुरू असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेमार्फत ३८ स्मशानभूमी चालवल्या जातात. धुरामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे सगळ्याच स्मशानभूमी ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत. अशातच स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठीच्या मृतदेहांच्या अस्थी, हार, फुलांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याऐवजी थेट कचऱ्यात फेकून देण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरातील कचरा वाहणाऱ्या घंटागाड्यांमधून अस्थींची वाहतूक केली जात असल्याचे पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने सांगितले, तर स्मशानातील राख काही लोक घेऊन जातात, तर स्मशानभूमीतील राख आणि इतर साहित्य कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यात टाकले जाते. ठेकेदारामार्फत हे काम केले जाते, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता धायगुडे यांनी दिली.
--------------------------------------
अंत्यविधीनंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानात येतात. काही अस्थी पवित्र ठिकाणी विसर्जन करतात. माझ्या भावाच्या अस्थींचे आम्ही नाशिक येथील पंचवटी घाटावर विसर्जन केले होते, पण त्याच्या इतर अस्थी आणि राखेचे ठाणे महापालिकेने काय केले माहीत नाही.
- सागर येडे, रहिवासी, ठाणे
-------------------------------
ठाण्यात रोज आठ टन फुले येतात. यातून निर्माण होणारा कचरा तलाव, खाडी आदी ठिकाणी जातो. त्यामुळे तेथील प्रदूषण वाढते. स्मशानातदेखील मोठ्या प्रमाणात हार, फुले जमा होत असतात. म्हणूनच पालिकेने निर्माल्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक आहे.
- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, समर्थ भारत व्यासपीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्चे तेल स्वस्त! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; पाहा ताजा भाव

US Iran War : इराण युद्धामुळे अमेरिका त्रस्त, जनरलचा लढाईस नकार; जनतेनेही साथ सोडली, ट्रम्प प्रशासनासमोर मोठा पेच

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फुटी रोखण्यासाठी मोदी सरकार आज संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

Jaygad Chiplun Satara Highway : मुंबई-गोव्यानंतर आता 'हा' तिसरा महामार्ग बदलणार कोकणाचे रूप; चिपळूण बनणार लॉजिस्टिक हब, पाहा कसा असेल मार्ग

Akola Crime: वृद्ध महिलेची सोन्याची पोत हिसकावणारा आरोपी जेरबंद

SCROLL FOR NEXT