मुंबई

‘महाप्रीत’चा ‘एनएलसी इंडिया’सोबत करार

CD

‘महाप्रीत’चा ‘एनएलसी इंडिया’सोबत करार
मुंबई : महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नाॅलाॅजी लिमिटेड (महाप्रीत) ही राज्य सरकारच्या मालकीची वीज कंपनी एनएलसी इंडिया रिन्यूएबल लिमिटेडच्या माध्यमातून राज्यात तब्बल पाच हजार मेगावाॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. दोन्ही कंपन्यांनी याबाबत करार केला आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात प्रदूषणरहित अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिवसोंदिवस सौर, पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला राज्य सरकारकडून चालना दिली जात आहे. त्याचाच भाग म्हणून महाप्रीतने पाच हजार मेगावाॅट क्षमतेचे वीज प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार मेगावाॅटचे प्रकल्प असणार आहेत. त्यामध्ये सौर, पवन, फ्लोटिंग सोलर, उदंचन जलविद्युत प्रकल्पांचा समावेश असणार आहे. या वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाल्यानंतर वीज वितरण कंपन्यांना आपले अपारंपरिक वीज वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Paper Leak: पेपर लीक प्रकरणांचा निकाल आता अवघ्या ३ महिन्यांत! MP मध्ये स्थापन होणार ४ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट!

Latest Marathi News Live Update : कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून संपविले जीवन; राळेगावमधील दुर्दैवी घटना

Mumbai News: मुंबईतील बेकरींवर एफडीएचा मोठा छापा; ६ परवाने निलंबित, ४ दुकाने बंद करण्याचे आदेश

अर्थबोध : ‘फायर’ एक सत्यकथा

IND vs ZIM, T20I: 'युवा खेळांडूंच्या ऊर्जेने...' श्रेयस अय्यरनं सांगितलं झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकाविजयाचं कारण

SCROLL FOR NEXT