IND vs ZIM, T20I: 'युवा खेळांडूंच्या ऊर्जेने...' श्रेयस अय्यरनं सांगितलं झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकाविजयाचं कारण

Shreyas Iyer on Maiden Series Victory: भारतीय संघाने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घ्या.
India vs Zimbabwe 3rd T20I

Vaibhav Sooryavanshi - Shreyas Iyer

Sakal

Updated on

Zimbabwe vs India T20I Marathi News: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली रविवारी (२६ जुलै) भारतीय संघाने झिम्बाब्वेला तिसऱ्या टी२० सामन्यात ३५ धावांनी पराभूत केलं. त्यामुळे भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिला.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध दमदार पुनरागमन केले. श्रेयसच्या नेतृत्वातील हा भारताचा पहिलाच टी२० मालिका विजय (T20I Series Win) ठरला आहे. या सामन्यानंतर श्रेयसनेही (Shreyas Iyer) आनंद व्यक्त केला असून हा खास क्षण असल्याचे म्हटले. तसेच त्याने संघातील खेळाडूंचेही कौतुक केले आहे.

India vs Zimbabwe 3rd T20I
IND vs ZIM 3rd T20I: भारताचा झिम्बाब्वेला व्हाईटवॉश! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर मयंक यादव-यश ठाकूरच्या माऱ्यासमोर यजमान गारद
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com