भिवंडी, ता. २ (बातमीदार) : महापालिकेने जल, मल लाभ करामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या निर्णयामुळे शहरातील करदाते नाराज झाले असून, नियोजनात्मक नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या पालिकेच्या निर्णयाला विरोध वाढला आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत आहे. तळमजल्यावर महापालिकेचे पाणी मिळविण्यासाठी विजेची मशीन लावावी लागते. महापालिका क्षेत्रातील जुन्या-नव्या गृहसंकुलांमधील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांकडून मालमत्ता करासोबत जल कर आकारणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वेगळा जल कर आकारताना सोसायटीच्या जलवाहिनीच्या कर रद्द केलेला नाही. अनेक ठिकाणी नियमित व सरकारी वेळेनुसार पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. त्याचप्रमाणे ड्रेनेजबाबत वारंवार तक्रार करूनदेखील चेंबर दुरुस्ती केली जात नाही. केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमधून शहरातील योजनांनुसार काम झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे, मात्र जल आणि मल वाहून नेण्याचे काम सुरू झालेले नाही. तसेच पाण्याच्या टाक्यांचे बांधकामांमधून पाणी वितरित झाले नाही. असे असताना करवाढीमुळे संतापाचे वातावरण आहे.
---------------------------------------------------------------------------------
मालमत्ताधारक अनभिज्ञ
भिवंडी महापालिकेचे माजी आयुक्त अजय वैद्य यांनी घेतलेल्या ठराव क्रमांक ७४३ नुसार पाणीपुरवठा विभागाच्या सूचनेने सध्याच्या प्रशासनाने जल आणि मल लाभ कर २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून लागू केला आहे. त्यानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षांपासून करयोग्य मूल्याच्या निवासी वापराकरिता १० टक्के व अनिवासीकरिता १५ टक्के कर आकारण्यात आला आहे, तर सर्वप्रकारच्या मालमत्तांना सरसकट आठ टक्के मालमत्ता कर आकारण्यात येणार आहे. याबाबत शहरातील मालमत्ताधारकांना कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. तसेच हरकतीही मागवलेल्या नाहीत.
---------------------------------------------------
भिवंडीत जल आणि मल प्रवाहासाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्या कार्यान्वित होणार आहेत. त्या योजनेनुसार चालणाऱ्या कामकाजासाठी नियमित येणारा खर्च आणि या योजना अद्ययावत ठेवण्यासाठी लागणारा खर्च मोठा असून, त्यासाठी दरवाढ करणे अपेक्षित आहे.
- संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता, भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.