मुंबई

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज

CD

वसई, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार शहरात पाच वर्षांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. औद्योगिक वसाहतीसह आर्थिक संकट, बेरोजगारांची स्थिती निर्माण झाली होती. पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित सहा रुग्ण आढळले असल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. प्रशासनाने ऑक्सिजन, आयसीयू तसेच राखीव खाटांमध्ये वाढ केली आहे.

वसई-विरार शहरात २०२०मध्ये मोठ्या प्रमाणात दैनंदिन कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी मज्जाव करण्यात आला होता. नागरिकांचा व्यवसाय, रोजगार ठप्प झाला होता. या वेळी महापालिकेच्या दवाखान्यांसह खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरून गेली होती. रुग्ण, नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. हीच परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून महापालिकेने आरोग्य यंत्रणेत वाढ केली आहे.

सध्या एकूण सहा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यातील पाच रुग्णांना घरी विलगीकरण करण्यात आले असून, एका रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. हा आजार बळावू नये, यासाठी आयसीयू, ऑक्सिजन बेड वाढवले जात आहेत तसेच व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन हॉस्पिटलमध्ये ७५ खाटांची व्यवस्था केली आहे तसेच ऑक्सिजन प्रकल्पामधून छोटे, ड्युरा सिलिंडरमधून प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सामाजिक अंतर ठेवावे. गर्दीत जाणे टाळावे, वैद्यकीय विभाग सजग झाला आहे. नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. सहा रुग्ण हे कोरोनासदृश आजाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी इस्पितळात राखीव खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याकडे लक्ष देण्यात येत आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार महापालिका

गर्दीवर नियंत्रण राखण्याचे आव्हान
कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता त्याला आवर घालण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असून चाचणीला सुरुवात केली असली तरी अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.

जनजागृतीवर भर
कोरोना आजारात काळजी घेण्यासाठी महापालिका हॉस्पिटलमध्ये मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यासह अन्य आरोग्य साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. याचसोबत कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात येत असून, व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

एकूण चाचणी ६,९७३
कोरोनाबाधित रुग्ण ६

रुग्णालयांतील खाटा
जीवदानी हॉस्पिटल २५
फादरवाडी रुग्णालय ५०
व्हेंटिलेटर १३१

खासगी राखीव हॉस्पिटल ५
ऑक्सिजनयुक्त खाटा ३४३
सामान्य खाटा १५०
आयसीयू खाटा ३४५
ऑक्सिजन ७८ मेट्रिक टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT