मुंबई

देशी रोपांच्‍या लागवडीवर भर

CD

देशी रोपांच्‍या लागवडीवर भर

वाशी, ता. ५ ( बातमीदार) : जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले. याअंतर्गत‍ उद्यान विभागाच्या वतीने पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपायुक्‍त शरद पवार, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि इतर अधिकारी, कर्मचारी तसेच आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा व त्यांचे सहकारी, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षरोपण संपन्न झाले.
महापालिकेने यावर्षी १.२५ लक्ष वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे उद्द‍िष्ट नजरेसमोर ठेवले असून, त्यापैकी सीबीडी बेलापूर, पारसिक हिल येथे बेलापूर पाण्याच्या टाकीजवळ आग्रोळी गावाकडून महापौर निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक डोंगराळ भागात सुरंगी, जांभूळ, मलबेरी, काजू, आवळा, बांबू अशा देशी प्रजातींच्या २५० हून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. अशाच प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात १४ ठिकाणी राबविण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्था व वृक्षप्रेमी नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. विशेष म्हणजे पक्ष्यांचा अधिवास वाढून जैवविविधतेत भर पडण्याच्या दृष्टीने प्राधान्याने देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.


नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांच्या मनातील वृक्षप्रेम वाढीस लागावे याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी १.२५ लक्ष वृक्षारोपणाचे उद्द‍िष्ट नजरेसमोर ठेवले असून, व्यापक लोकसहभागातून ते साध्य होईल. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विनामूल्य देण्यात येणारी वृक्षरोपे घेऊन नागरिकांनी ती योग्य ठिकाणी लावावीत व त्याची जपणूक करावी.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नमुंमपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Buldhana News: उत्साहाला गालबोट! नदीकाठी आंदोलन पेटलं, स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला जलसमाधी; जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

SCROLL FOR NEXT