मुंबई

घोडबंदर मार्गावर दोन दिवस प्रवेश बंद

CD

घोडबंदर मार्गावर तीन दिवस प्रवेश बंद
वाहतूक बदलामुळे ढोकाळी परिसर वाहतूक कोंडी होणार

ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) ः कापूरबावडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीतील घोडबंदर मार्गावर तीन दिवस सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नळपाडा पाइपलाइन येथे चार पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम करणार असल्याने वाहतूक विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाकडून या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला असून, कापूरबावडी सर्कल पुलाखालून नंदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे जाणार आहेत. या वाहतूक बदलामुळे ढोकाळी परिसर वाहतूक कोंडी होणार आहे.

ठाण्याहून घोडबंदरला जाणाऱ्या रस्त्यावर नळपाडा पाइपलाइन येथे पिलर क्रमांक पी२७, पी२८ व पी२८, पी२९ या चार पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी ५५० टनाच्या दोन क्रेन ठाणे घोडबंदर स्लीप रोडवर नळपाडा पाइपलाइन येथे उभ्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाण्याकडून घोडबंदरकडे स्लीप रस्त्यावरून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक शनिवारी (ता. ७) ते रविवारी (ता. ८) पर्यंत रात्री ११ ते ६ आणि ८ मे ते ९ मे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. तसेच लोकांनी ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणे टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरून कापूरवावडी सर्कल मार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग : ही सर्व प्रकारची वाहने कापूरबावडी सर्कल येथून पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन नदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे जातील. त्याचप्रमाणे रवि स्टील नाका येथून डाव्या बाजूस वळण घेऊन पोखरण रस्ता क्र.२, गांधी चौक येथून उजव्या बाजूस वळण घेऊन खेवरा सर्कल मार्गे जातील.

प्रवेश बंद : नळपाड्यातून बाहेर येऊन तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाइपलाइन येथे प्रवेश बंद केला आहे.

पर्यायी मार्ग : या मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाइपलाइन येथून यू-टर्न घेऊन नळपाडा येथून पुढे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT