कर्मचाऱ्यांनी घेतली वीज सुरक्षेची शपथ
महावितरणचा विद्युत सुरक्षा सप्ताह
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : महावितरणच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेत राज्यभरात १ ते ६ जूनदरम्यान वीज सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ६) कल्याण परिमंडल, चार मंडल कार्यालये, १० विभाग कार्यालये तसेच ४० उपविभागीय आणि १८१ शाखा कार्यालयांत चार हजार १८१ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेची शपथ घेतली. यात दोन हजार ६४२ नियमित कर्मचारी तर एक हजार ५३९ कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.
मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सप्ताहात अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत मॅरेथॉन, रॅली, चित्रकला व निबंध स्पर्धा, रहिवासी सोसायट्यांना भेटी अशा विविध माध्यमांतून वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी सकाळी परिमंडल कार्यालयाच्या आवारात मुख्य अभियंता मिश्रा यांच्या उपस्थितीत वीज सुरक्षेची शपथ घेण्याचा मुख्य कार्यक्रम झाला. या वेळी कल्याण मंडल १चे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कल्याण मंडल २चे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता मोहन काळोगे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश अंचिनमाने, चाचणी विभागाचे अधीक्षक अभियंता मंदार अत्रे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांच्यासह अभियंते, अधिकारी, नियमित कर्मचारी व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या उपस्थितीत पालघर व अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या उपस्थितीत वसई मंडल कार्यालयात वीज सुरक्षेची शपथ घेण्यात आली. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत काम करण्याबाबत शपथ घेण्यात आली. तर महावितरणच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचारी व कुटुंबीयांसाठी कल्याण, पालघर व वसईत शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.