शहापूर, ता. ७ (वार्ताहर) : तालुक्यातील नांदगाव महसुली गावाजवळील पळसोली नावाचे लहानसे गाव आहे. शेतशिवारात वसलेल्या या गावातील शेकडो कुटुंबांच्या घरांना वीजपुरवठ्याची व्यवस्था नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून कंदील, चिमणीच्या साहाय्याने रात्र काढावी लागत होती; पण जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी उपयोजनेतून मिळालेल्या निधीतून नवीन वीज रोहित्र बसवल्याने अंधारावर मात केली आहे.
२०२३-२४ या विद्युत विकास योजनेतून १०० केव्ही क्षमतेचे नवीन वीजरोहित्र तसेच १२ वीजखांब आणि वीजवाहिन्या यासाठी १३ लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. निधीच्या खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे पळसोलीत नवीन वीजरोहित्राबरोबर वीजखांब उभे राहिले आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्याअभावी तब्बल ५० वर्षांपासून अंधारात असलेली घरे शनिवारी (ता. ७) वीजपुरवठ्यामुळे उजळून निघाली. या वेळी नवीन रोहित्र बसल्याने घरगुती वापरासोबतच शेतीच्या पाणीपुरवठ्याला आवश्यक असणाऱ्या विजेचाही प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून आनंद आहे. या वेळी सरपंच जयवंत वाघ, भगवान धानके, राईस मिलच्या संचालिका सोनाली सुनील धानके, शहापूर कृउबाचे संचालक अशोक सपाट यांची उपस्थिती होती.
----------------------------------------
माजी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा
शेतवाडीवरील घरांमध्ये अंधार असल्याने पावसाळ्यात विविध अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे पळसोलीतील वीजपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार गावाला शासकीय योजनेचा लाभ मिळाला असून वीजपुरवठ्यासाठी ५० वर्षांपासूनची प्रतीक्षा थांबली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.