मुंबई

बोरिवलीत वृक्षारोपण, पर्यावरणाविषयी जनजागृती

CD

बोरिवलीत वृक्षारोपण, पर्यावरणाविषयी जनजागृती
मुंबई, ता. १० ः जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय व मुंबई महापालिका आर. मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवलीत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी उपस्‍थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. आमदार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क सेवालय कार्यालयाजवळ मोक्ष प्लाझासमोर बोरिवली पश्चिम येथे हा कार्यक्रम पार पडला. प्रदूषणाला आळा घालून प्लॅस्टिकचा वापर टाळावा, ओला कचरा, सुखा कचरा, घातक वस्तूंचे वर्गीकरण कसे करावे, यासंदर्भात माहिती या वेळी देण्यात आली. या कार्यक्रमात जमलेल्या नागरिकांनी आमदारांसमवेत स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. चिकूवाडी येथे स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार उपाध्याय यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘स्वच्छ बोरिवली, सुंदर बोरिवली’ हा नारा देत प्लॅस्टिकमुक्त बोरिवली करण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, पालिकेतर्फे संदीप म्हाळुंगकर, दिनेश पाटील, माधव गायकवाड, अजय शिंदे, ऋतुजा धामणकर, सतीश शिरसाट, घनकचरा विभागाचे कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT