मुंबई

अलिबागच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात दिवसाला हजारो प्रवासी येत असतात. या प्रवाशांना शहराच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. वडखळ ते चेंढरेपर्यंत चांगल्या स्थितीत असलेल्या या रस्त्यावर अलिबागच्या प्रवेशद्वारावरच भलेमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी अलिबाग नगरपालिका, चेंढरे ग्रामपंचायत असे कोणीही पुढाकार घेत नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज वटपौर्णिमेचे औचित्य साधून काही सत्यवानांनी येथील खड्ड्यात वडाचे झाड लावून सरकारचा निषेध केला आहे.
जलवाहतूक बंद झाल्यानंतर रस्ते मार्गाने अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. अलिबागच्या प्रवेशद्वारावरच जेमतेम ५० मीटर अंतराच्या या लहानशा तुकड्यावरील खड्ड्यांचा त्रास सर्वांनाच होत आहे. नीलिमा हॉटेल ते एचपी गॅस पंप या दरम्यानच्या रस्त्याचे काम अनेक वर्षे झालेच नाही. दरवर्षी त्याची डागडुजी करून मलमपट्टी केली जाते. पुन्हा पावसाळा सुरू झाला की हे खड्डे पुन्हा तोंड वर काढतात. नुकत्याच पडलेल्या पावसाने हे खड्डे अधिकच वाढले आहेत. त्यामुळे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायतींना या रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
------------------------
सत्यावानांच्या खड्ड्याभोवती फेऱ्या
वटपौर्णिमेचे औचित्य साधून अलिबाग परिसरातील सत्यवानांनी रेवदंडा बायपास येथे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी साकडे घातले. अलिबाग शहराच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अलिबाग-वडखळ रस्त्यावर अनेक वर्षे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे बुजविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे. लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजविण्याची मागणीदेखील केली आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यासाठी स्थानिक तरुणांनीच वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात वडाचे झाड लावून विधिवत पूजा करून वडाला फेऱ्या मारल्या. तरुणांनी केलेला हा प्रकार पाहून वाहनचालकांनी आणि नागरिकांनी त्यांना साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT