मुंबई

धोकादायक संरक्षक भिंतीचे काम सुरू

CD

धोकादायक संरक्षक भिंतीचे काम सुरू
मेघवाडीतील सूर्योदय सोसायटीतील रहिवाशांना दिलासा
जोगेश्‍वरी, ता. ११ (वार्ताहर) ः सर्वोदयनगर मार्गावरील कोकण नगरजवळील मेघवाडी सूर्योदय सोसायटीलगत कंपाउंडजवळ जमीन खचण्याची घटना गुरुवारी (ता. ५) घडली होती. याबाबत ‘सकाळ’च्या रविवारच्या (ता. ८) अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत विकसकाने येथील संरक्षक भिंतींचे काम सुरू केले आहे.
येथील दगड-मातीचा ढिगारा खचल्‍याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला होता. त्याचा परिणाम म्हणून येथील जमीन खचली होती. बातमीची तातडीने दखल स्‍थानिक आमदार रवींद्र वायकर व नव्‍याने येथे पुनर्विकास करू पाहणाऱ्या विकसक बिद्रा यांनी घेतली. आमदार वायकर यांनी विकसकाबरोबर चर्चा केली. तसेच येथे लागूनच सुरू असलेल्‍या बांधकाम प्रकल्‍पाच्या विकसकाला संरक्षक भिंत बांधून देण्याच्या सूचना केल्‍या. त्‍यानंतर येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT