मुंबई

मैदान वाचवण्यासाठी पालिकेवर धडक

CD

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : विकास आराखड्यातून खेळाचे मैदान रद्द करण्याच्या मागणीसाठी जुईनगर आणि शिरवणे ग्रामस्थांनी महापालिकेच्या विरोधात बुधवारी (ता. ११) धडक मोर्चा काढला होता. मैदान वाचवण्यासाठी नवी मुंबईतील शेकडोहून अधिक ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी ‘मैदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
जुईनगर सेक्टर २१ येथे असलेल्या भूखंडावर आतापर्यंत मैदानाचे आरक्षण होते. त्यानुसार येथील नागरिक खेळासाठी, फिरण्यासाठी या मैदानाचा वापर करीत आले आहेत; मात्र मुंबई उच्च न्यायालयात २०२४ मध्ये दाखल झालेल्या जनहित याचिकेचा दाखला घेत या ठिकाणची माती काढण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. त्यानंतर या मैदानावर असलेले आरक्षण लक्षात आणून दिल्यावर ही निविदा थांबवण्यात आली होती. शहर विकास आराखडा मंजुरीसाठी गेलेला असताना आणि त्यावर कोणताही निर्णय आलेला नसताना, या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले. आता पुन्हा या भूखंडावरील माती काढण्याचे काम सुरू होत आहे. केवळ कंत्राटदाराचा फायदा करून देण्यासाठी महापालिका अधिकारी हे काम करीत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी माजी नगरसेवक एम. के. मढवी, माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते.
--------------
मोर्चामध्ये असणारी गर्दी पाहता मैदान किती गरजेचे आहे, हे स्पष्ट होत आहे. मैदान आहे तिथेच राहिले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आजचा मोर्चा हा कोणा एका व्यक्तीचा नसून समस्त खेळाडूंचा आहे. त्यामुळे विकास आराखड्यातून मैदान रद्द करून मैदान आहे तसेच ठेवावे.
- डॉ राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT