मुंबई

श्रीवर्धनला सुसज्ज मैदानाची प्रतीक्षा

CD

श्रीवर्धनला सुसज्ज मैदानाची प्रतीक्षा
उदयोन्मुख खेळाडूंमध्ये नाराजी; प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) ः श्रीवर्धनमध्ये अद्ययावत असे क्रीडा संकुल नसल्याने उदयोन्मुख खेळाडूंचे नुकसान होत आहे. श्रीवर्धन शहराला सुसज्ज मैदानाची गरज असताना याबाबतीत नगर परिषद प्रशासन उदासीन असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
२०१५-२०१६ या कालावधीपर्यंत तरुण व हौशी खेळाडूंना कबड्डी, क्रिकेट, खो-खो या मैदानी खेळांचा सराव करण्यासाठी ओसाड शेत किंवा पडीक जमिनीचा आसरा घ्यावा लागत होता. जमीन मालकाची परवानगी घेऊन सरावासाठी योग्य असे मैदान खेळाडू तयार करत असत. त्यानंतर तयार केलेल्या जागेवर हौशी खेळाडू तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन करीत. विशेष म्‍हणजे पडीक जागेत सरावासाठी तात्पुरते मैदान उभारणारे खेळाडू राज्यस्तरीय पातळीवर चमकले आहेत, तर काही जणांची राज्यातील नामांकित संघासाठी निवड झाली आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून श्रीवर्धन येथील वाढत्या पर्यटनामुळे अनेकांनी पडीक व ओसाड जमिनींवर रिसॉर्ट, रेस्टॉरंट, हाॅटेल उभारली आहेत. त्‍यामुळे अशा मोकळ्या जागादेखील कमी झाल्या आहेत. त्‍यामुळे काही हौशी खेळाडू आपल्या शेतजमिनीत क्रिकेट, कबड्डी, खो-खोच्या सरावासाठी तात्पुरते मैदान करून घेतात, परंतु पावसाळी चार महिने भातपीक, नाचणी लागवड होत असल्याने त्‍यांच्या सरावात बाधा येत आहे. त्‍यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेने आम्हाला हक्काचे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येत आहे.
===================================================================================================
प्रतिक्रिया :-
श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण खासगी जमिनीवर आहे; त्याबाबत अधिग्रहण लवकर सुरू करून सुसज्ज स्टेडियमच्या निधीसाठी केंद्र शासनाच्या योजनेचा पाठपुरावा करणार आहोत.
-विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT