मुंबई

७५ लाखांची सायबर फसवणूक उघडकीस

CD

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : कंपनीचा संचालक असल्याचे भासवून तुर्भे येथील एका कंपनीच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने तब्बल ७५ लाख रुपये उकळले. या टोळीतील दोन आरोपींना सायबर पोलिसांनी केवळ १७ दिवसांत अटक केली आहे. सायबर पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सायबर टोळीने मे महिन्यामध्ये तुर्भे येथील परदेशात फळे निर्यात करणाऱ्या एका कंपनीच्या अकाउंटंटला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तो कंपनीचा संचालक असल्याचे भासवले होते. तसेच नवीन प्रोजेक्टसाठी पैसे भरण्याचा बहाणा करून अकाउंटंटला ऑनलाइन ७५ लाख रुपये पाठवण्यास सांगितले होते. त्या व्हॉट्सॲप नंबरवर कंपनीच्या संचालकाचा फोटो असल्याने अकाउंटंटला त्याच्यावर विश्वास बसल्याने त्याने सायबर टोळीने दिलेल्या बँक खात्यावर ७५ लाख रुपये पाठवून दिले होते; मात्र कंपनीच्या खऱ्या संचालकाने अकाउंटंटला संपर्क साधल्यानंतर सायबर टोळीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली होती. पोलिस तपासात सायबर टोळीने कंपनीकडून आलेली ७५ लाखांची रक्कम दोन तासांमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँक खात्यात वळती करून काढून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक, निरीक्षक सचिन गिड्डे, पोलिस हवालदार सचिन शिंगोटे, पोलिस नाईक मंगेश गायकवाड व पुनम गडगे यांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या बँक खात्यांचा शोध घेऊन त्यांचा तपशीलवार अभ्यास केला.
------------------
पाच दिवसांची पोलिस कोठडी
फसवणुकीतील पाच लाख मुंबईतील मालवणी येथील एका महिलेने व पुरुषाने चेकद्वारे काढल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालवणी परिसरातील आरोपी शाबाज आरीफ अन्सारी (३०) याला ६ जूनला अटक केली. त्याने बिलकिस नसीम मोमीन उर्फ बिको (४९) हिच्याकडून तिचे बँक खाते सायबर टोळीला दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी तिलादेखील अटक केली. या दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT