मुंबई

गुंतवणुकीच्या नावाखाली कोटींची सायबर फसवणूक

CD

गुंतवणुकीच्या नावाखाली कोटींची सायबर फसवणूक
नवी मुंबई पोलिसांकडून दोन आरोपी गजाआड
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) ः आयपीओ व इंडेक्स ट्रेडिंगमधील गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत चार कोटी ७१ लाख ६५ हजार रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा महाराष्ट्रासह देशभरातील अन्य राज्यांतील १० सायबर फसवणूक प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक वाशीमध्ये राहण्यास असून, ते मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. गत ३० नोव्हेंबर २०२४ रोजी या ज्येष्ठ नागरिकाने शेअर्समध्ये गुंतवणुकीबाबत फेसबुकवर आलेली जाहिरात पाहून त्यात आपली माहिती भरली होती. त्यानंतर सायबर टोळीने त्यांना संपर्क साधून एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले होते. त्यानंतर या टोळीने त्यांना आयपीओ व इंडेक्स ट्रेडिंगमध्ये अधिक लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर या टोळीने गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यांवर रक्कम पाठवण्यास सांगून त्यांच्याकडून चार महिन्यांमध्ये चार कोटी ७१ लाख ६५ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली होती. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम व पोलिस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांच्या पथकाने तांत्रिक तपास व या गुन्ह्यातील बँक खात्याचे विश्लेषण केले असता, काही रक्कम करंजाडे येथे राहणारा इस्टेट एजंट विकास प्रकाश गव्हाणे (वय २७) याच्या खात्यात गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विकासला अटक केली. त्याच्या चौकशीत वाशिम जिल्ह्यातील मनोज विष्णू कालापाड (वय २२) याच्या सांगण्यावरून त्याने त्याचे बँक खाते दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी वाशिम येथून मनोज कालापाड यालादेखील अटक केली. या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी आता या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Municipal Elections : काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे संकेत!

तो घाबरला अन् गोंधळला! वियान मुल्डरवर लाराचा ४०० धावांना विक्रम न मोडल्याने Chris Gayle भडकला

सत्यभामा! सती परंपरेला बळी पडलेल्या निष्पाप स्त्रियांची गाथा, निस्सीम प्रेमाच्या त्यागाची कहाणी, पोस्टर पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

Nashik Crime : सिडकोत भरदिवसा वृद्धाची हत्या; लाकडी दांडक्याने डोक्यात वार

Ulhasnagar News : उल्हासनगरात चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; धीरज चव्हाण यांनी पदभार स्विकारला

SCROLL FOR NEXT