
दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार विआन मुल्डरने काही दिवसांपूर्वीच मोठा विक्रम केला. त्याने ७ जुलै रोजी झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्रिशतक झळकावत अनेक विक्रमही केले.
अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुल्डरने जबाबदारी खांद्यावर घेत मोठी खेळी केली. पण तरी त्याने डाव घोषित करण्याच्या वेळेवरून अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने मुल्डरवर जोरदार टीका केली आहे.