बालमजुरीचा प्रश्न सुटणार कधी?
देशातील अनेक भागात अद्यापही समस्या कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गरिबी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करण्याची आवश्यकता तसेच अभ्यासात रस नसल्याने देशातील विविध भागात अजूनही बालमजुरीची समस्या कायम आहे. त्यामुळे बालमजुरीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे ‘चाईल्ड राइट्स अॅण्ड यू’ (क्राय) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
देशातील बालमजुरीच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी ‘क्राय’ने देशातील विविध राज्यांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात प्रामुख्याने गरिबी आणि शिक्षण या दोन कारणांमुळे ही समस्या कायम असल्याचे म्हटले आहे. गरिबी (३४.२ टक्के), कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याची गरज (२८.६ टक्के), कुटुंबांचा दबाव (१७.४ टक्के) तसेच शिक्षणाची सुविधा नसणे किंवा अभ्यासात रस नसणे आदी कारणांमुळे लहान मुले मजुरी करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये शिकण्यास अनुकूल वातावरण आणि त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे गरजेचे असल्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे.
----
कोणत्या उपाययोजना ठरणार प्रभावी?
८३.२ टक्के
माध्यान्ह भोजन आहार योजना
---
९१.७ टक्के
कला-क्रीडाविषयक उपक्रम
---
९४.१ टक्के
शिक्षण
----
२२.१ टक्के
जनजागृती मोहीम
---
१८.६ टक्के
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता
----
१५.२ टक्के
कुटुंबांना आर्थिक मदत
---
१४.७ टक्के
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
----
बालहक्कांविषयी सजगता
‘क्राय’ने या सर्वेक्षणात देशभरातील २,३६५ व्यक्तींचे मत जाणून घेतले. त्यापैकी ४७.६ टक्के व्यक्ती या १८ ते २१ वयोगटातील होत्या. त्यापाठोपाठ १३ ते १७ वयोगटातील २१.८ टक्के, तर २२ ते ३० वयोगटातील २०.३ टक्के व्यक्ती सहभागी होत्या. त्यामुळे बालमजुरी आणि बालहक्कांविषयी देशातील तरुण पिढी सजग असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.