मुंबई

परप्रांतीय फेरीवाल्यांचा तरुणावर चाकूहल्ला

CD

ठाणे, ता. ११ : दिवा शहरातील बेडेकर नगर येथे झालेल्या किरकोळ वादातून परप्रांतीय फेरीवाल्यांनी एका तरुणावर चाकूहल्ला केला होता. या घटनेनंतर राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, ठाणे महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
दिव्यातील बेडेकर नगर येथे राहणारा जितेश उत्तेकर नेहमीप्रमाणे कामासाठी टेम्पो बाहेर काढताना फेरीवाल्याच्या छत्रीला धक्का लागला होता. या प्रकारानंतर फेरीवाल्यांचे तरुणासोबत भांडण झाले होते. या वेळी फेरीवाल्यांच्या कुटुंबातील तीन पुरुष आणि एक महिला सदस्याने जवळच्या चाकूने तरुणाच्या अंगावर धावून त्याला मारहाण केली होती. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, स्थानिकांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत जितेश उत्तेकर हा तरुण जखमी झाला असून, मनसेपाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाने फेरीवाल्यांच्या मग्रुरीविरोधात आक्रमक झाली आहे.
-----------------------------------
पालिका प्रशासनाची डोळेझाक
घटनेची दखल घेत दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस चौकीत धाव घेत फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दिव्यात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला असताना ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दिवा शहर बकाल झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.
-------------------------------------
चाकूने हल्ला करण्यापर्यंत फेरीवाल्याची मजल गेली आहे. त्यांना प्रशासनाची कोणातीच भीती उरलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल.
-प्रशांत गावडे, सचिव, दिवा शहर, मनसे
----------------------------------
दिव्यात सर्वसामान्य नागरिकांना फेरीवाल्यांच्या मनमानीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन झोपा काढत असल्यामुळे सामान्य मराठी माणसावर अन्याय होत आहे. दिव्यात फेरीवाल्यांच्या मग्रुरीला ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत.
- ज्योती पाटील, शहर संघटिका, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT