मुंबई

नितेश राणेंवर ठाण्यात बोचरी टिका

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाण्यातील तीन हात नका परिसरात लावलेल्या फलकावर ठाकरे बंधू एकत्र येण्याची महाराष्ट्राची इच्छा असल्याचे लिहिले होते. तसेच या फलकाच्या माध्यमातून नितेश राणे यांनादेखील डिवचताना आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने तत्काळ फलक हटविण्याची कारवाई केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. या दोन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे आंदोलन करीत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी तुषार रसाळ यांनी तीन हात नाका चौकात लावलेला फलक चर्चेचा विषय ठरला होता. या फलकावर ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत. मी, दिवंगत दिलीप पंढरीनाथ रसाळ यांचा मुलगा तुषार दिलीप रसाळ’ असा मजकूर लिहिलेला आहे. या माध्यमातून भाजप नेते नितेश राणे यांना लक्ष्य केले गेल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन मराठी वाघ एकत्र येणे, ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे सांगत एकत्र येण्यासाठी साद घातली आहे. या फलकामुळे वाद उद्भवण्याची शक्यता असल्याने पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने तातडीने फलक हटविण्याची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT