‘एसआरए’च्या
दारात रद्दीचा खच
टेंडर प्रक्रियेला विलंब; पुन्हा पावसात भिजण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) आपल्या कार्यालयात साफसफाई मोहीम राबवून तब्बल २५ टनांहून अधिक रद्दी काढली आहे. महिनाभरापासून हा रद्दीचा खच मुख्यालयाच्या दारातच पडून आहे. मे महिन्यात अचानक आलेल्या पावसाने ही रद्द पुरती भिजली होती; मात्र विक्रीसाठीच्या टेंडर प्रक्रियेला होणाऱ्या विलंबामुळे रद्दीचा ढीग अद्याप तिथेच पडून आहे. पुन्हा पाऊस आल्यास ती भिजणार आहे.
एसआरए प्राधिकरण वेगवगेळे एसआरए प्रकल्प मार्गी लावते. त्यासाठी झोपडपट्ट्यांचा सर्व्हे करून रहिवाशांची कागदपत्रे तपासून पात्रता निश्चित करते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही कागदपत्रे कार्यालयातच पडून होती. त्या पार्श्वभूमीवर एसआरएने राबवलेल्या साफसफाई मोहिमेत मोठ्या प्रमाणात रद्दी जमा झाली आहे. या रद्दीची तत्काळ विक्री करून जागा रिकामी करणे अपेक्षित असतानाही महिनाभरापासून ती पडून आहे. त्यामुळे हा रद्दीचा ढीग कधी काढणार, असा प्रश्न एसआरए कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पडत आहे. ही रद्दी तत्पुरत्या स्वरूपात ताडपत्रीने झाकण्यात आली आहे. ही रद्दी भिजलेली असल्यामुळे त्यातून कुबट वास येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.