मुंबई

प्राचार्याच्या छळाला कंटाळुन विद्यार्थ्याची आत्महत्या

CD

प्राचार्याच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
पनवेलमधील पोयंजे येथील नर्सिंग कॉलेजमधील घटना
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : पोयंजे येथील सारा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजमधील प्राचार्याच्या छळाला कंटाळून हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी मृत विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सारा नर्सिंग कॉलेजमधील महिला प्राचार्या निशा श्रीजीत नायर हिच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल केला आहे.

उदय मोतीलाल आगळे (वय १९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो छत्रपती संभाजी नगरमधील आहे. उदयला सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने त्याचा कुठेही नंबर लागला नव्हता. याच कालावधीत पोयंजे भागात असलेल्या सारा नर्सिंग कॉलेजने उदयला संपर्क साधून त्याला बीएस्सी नर्सिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यास सुचवले होते. तसेच तो राखीव वर्गातील असल्याने त्याला सवलतीही मिळतील, असे कॉलेजकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे उदयने या कॉलेजमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये प्रवेश घेतला, मात्र प्रत्यक्षात त्याला कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. उलट कॉलेजकडून पाच लाख रुपये मागण्यात आले. उदयने याबबात जाब विचारला असता, कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी उदयाला सर्वांसमोर जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक देत त्याची अवहेलना सुरू केली. याबाबतची माहिती उदय पालकांना देत होता, मात्र पालक त्याची समजूत काढून फक्त शिक्षणावर लक्ष देण्याबाबत सांगत होते, मात्र त्यानंतरही त्याचा अपमान सुरूच होता. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, उदयला निशा नायर हिच्याकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याचे उघडकीस आले. इतर विद्यार्थ्यांनीही याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

विद्यार्थ्याचा दु:खद अंत
प्राचार्या निशा नायर हिच्याकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने उदयने मंगळवारी (ता. ३) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या आईला संपर्क साधून सर्वांची विचारपूस केली. त्यानंतर त्याने प्राचार्याच्या छळाला कंटाळल्यामुळे जीवन संपवत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने हॉस्टेलमधील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. उदय फोन उचलत नसल्याने त्याच्या आईने त्याचा मित्र नरसिंह गिरी याला संपर्क साधून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार नरसिंह हा उदयच्या रूमवर गेला असता, तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Vijay Pandit : अपयशातून घडविले खाकीचे नवे शिलेदार! विजय पंडित यांना १३ वेळा अपयश, तरीही ४० जणांना वर्दीचे धडे

Raj Thackeray : जिथे जाल तिथे मराठीतच बोला; राज ठाकरे यांनी मांडला 'स्वप्नातील महाराष्ट्र'

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

SCROLL FOR NEXT