मुंबई

कोलाड येथे बनावट तणनाशक जप्त, आरोपी अटक

CD

बनावट तणनाशक जप्त, आरोपीला अटक
कोलाड येथे कृषी विभागाची धडक कारवाई
रोहा, ता. १२ (बातमीदार) ः बनावट तणनाशकांविरोधात कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल दोन लाख ६९ हजार रुपये किमतीचा साठा कोलाड आंबेवाडी येथे जप्त केला. कृषी विभागाने कोलाड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून, यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे.
येथील ओम तेल घाणा केंद्रामध्ये अवैधरीत्या अनधिकृत विनापरवाना तणनाशक विक्री सुरू असल्याची खात्रीलायक बातमी कृषी विभागाला मिळाली होती. त्यावरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून एका व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून प्रतिलिटर ९६० रुपये किमतीच्या २८० बॉटल जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत दोन लाख ६८ हजार ८०० रुपये इतकी आहे. विक्रेत्याकडे कुठल्याही प्रकारचा विक्री परवाना, उत्पादन नोंदणी क्रमांक सापडलेला नाही. त्यामुळे जप्त केलेली तणनाशके विश्लेषणाकरिता प्रयोगशाळेत पाठवली आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे व जिल्हा कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी महेश नारायणकर व जिल्हा गुणवत्ता गुण नियंत्रण निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली व कोलाड पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी आरोपी धनजीभाई कातारीया (वय ५६, रा. समर्थनगर, मूळ रा. वसई) या विक्रेत्याविरोधात फसवणूक व बनावट तणनाशक विक्री करण्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. जी. भोजकर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

SCROLL FOR NEXT