मुंबई

जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव

CD

मनोर, ता. १४ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सोमवारी (ता. १६) शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे शैक्षणिक वर्षासाठी नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात स्वागत केले जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शंभर विद्यार्थी उपस्थित राहावेत, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शाळा प्रवेशाला पात्र मुलांची आकडेवारी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी आणि गावस्तरावर जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत गोळा करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. उपक्रमांची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाने केली जाणार आहे.

स्थलांतरित बालकांचा शोध घेणार
गावागावांमध्ये शाळांमधील शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात आले आहे. प्रवेश योग्य विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये त्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच वयाची सहा वर्षे पूर्ण केलेल्या प्रवेशपात्र शंभर टक्के विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना शोधून प्रवेश देण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात आले आहे.

शाळा पूर्वतयारी व स्वच्छता
शनिवार आणि रविवारी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा परिसर, वर्गखोल्यांची स्वच्छता, तसेच सजावट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा परिसरात स्वच्छता, आकर्षक व विद्यार्थीस्नेही वातावरण निर्माण केले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची गोड सुरुवात घडवून आणणे, बालकांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण करणे, तसेच पालकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि मोजे यांचे वितरण, तसेच मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ दिले जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सोमवार आणि मंगळवारी शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी दिली आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळा ३,३०८
एकूण मुले ७,४९,७७४
मुले ३,८८,२०१
मुली ३,६१,५७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : शिवरायांच्या रायगडात डान्सबारांचा सुळसुळाट, मराठी माणसांच्या जमिनी धोक्यात! राज ठाकरेंचा संताप

ENG vs IND, 5th Test: भांडणं झाली पण तरी जो रुट - करुण नायरच्या त्या कृतींनी जिंकली लाखो चाहत्यांची मनं; पाहा नेमकं काय झालं

Neck Lump Causes: सतत मानेच्या खाली गोळा जाणवतोय? मग हे कारण आणि उपाय जाणून घ्या

Megaflash Lightning : अमेरिकेत ८२९ किमीपर्यंत विजेचा लखलखाट, सर्वांत लांब अंतरापर्यंत चमकल्याचा नवा विक्रम; २०१७ मधील वादळात नोंद

Raj Thackeray: एकदा अटक करून दाखवा, राज ठाकरेंचे सरकारला खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT