मुंबई

नालेसफाई असमाधानकारक

CD

नालेसफाई असमाधानकारक
स्वच्छता अधिकारी निलंबित
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी गुरुवारी (ता. १२) दिवसभरात कल्याण पूर्वेतील जे आणि ड प्रभाग क्षेत्रातील नालेसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. जे प्रभागात आयुक्तांनी लोकग्राम व मंगलराघोनगर या परिसरातील मध्यम नाल्यांची सफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या नाल्यांची ६५-७० टक्के सफाई झाल्याची माहिती प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. तसेच ड प्रभागात आयुक्तांनी विजयनगर नाका व तिसगाव पाडा या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन नालेसफाई व परिसर स्वच्छतेची पाहणी केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी नालेसफाईचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्याने ड प्रभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र खैरे यांना निलंबित करण्यात आले.

नालेसफाई पाहणीपूर्वी महापालिका आयुक्त अभिनव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जे आणि ड प्रभागातील आपत्कालीन परिस्थितीतील पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या, त्या इमारतीतून रहिवासमुक्त केलेल्या कुटुंबांची संख्या तसेच अनधिकृत होर्डिंगविरोधातील कारवाईबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच पुढील आठ दिवसांत प्रभागातील सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, उपआयुक्त प्रसाद बोरकर, संजय जाधव, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मनोज सांगळे, जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT