मुंबई

मलेरियाच्या डासांमुळे मुंबईकर आजारी

CD

मलेरियाच्या डासांमुळे मुंबईकर आजारी
दररोज १३ जणांना मलेरियाची लागण, दोघांना डेंगी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पावसाळ्यापूर्वीच मुंबई महानगरात डेंगी आणि मलेरियाच्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचे शेकडो रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी ७ जूनपर्यंत मुंबईत दररोज सरासरी १३ जणांना मलेरिया, दररोज दोन मुंबईकरांमध्ये डेंगीचे निदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वेळी मलेरियाच्या रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पावसाळा येताच डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या रुग्‍णांमध्ये लक्षणीय वाढ होते. या वेळी मे महिन्यातच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात मलेरियाची लागण झालेल्यांची संख्या दोन हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर गेल्या पाच महिन्यांत डेंगीची लागण झालेल्यांची संख्याही ३५०च्या पुढे गेली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ७ जून या कालावधीत मलेरियाचे २,११४ रुग्ण आणि ३७० जणांना डेंगीची लागण झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत डेंगी आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्वच्छ पाण्यात प्रजनन करणाऱ्या अ‍ॅनोफिलीस डास चावल्‍याने होणाऱ्या मलेरिया आजाराचे आकडे पावसाळ्यापूर्वीच खूप जास्त वाढले आहेत.
२०२४ मध्ये ७ जूनपर्यंत मुंबईत मलेरियाचे १,७७४ रुग्ण होते. यावर्षी हा आकडा २,११४ वर पोहोचला आहे. मलेरियाच्या वाढत्या प्रकरणांच्या संदर्भात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की या वेळी अधूनमधून अनेकवेळा पाऊस पडल्‍याने डासांच्या प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या वाढला आहे.

थांबून पडणारा पाऊस घातक
पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की पालिकेने अनेक ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या आहेत; मात्र पाऊस थांबून पडत असल्याने याचा सर्वाधिक परिणाम डासांच्या वाढीवर होतो. याच पावसामुळे चांगल्या पाण्यात मच्छर प्रजनन करतात. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने नालेसफाईची कामे बऱ्याच ठिकाणी झालेली नाहीत, हेदेखील एक प्रमुख कारण आहे.

अशी घ्या काळजी
- पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया असे आजार पसरतात.
- हे आजार टाळण्यासाठी रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, लक्षणे असल्यास गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाका-तोंडावर रूमाल धरावा. मास्क वापरावा.
- घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

घरांची, परिसराची तपासणी
डेंगी, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याकडून नियमितपणे करण्यात येत असते.

मलेरिया-डेंगीची लक्षणे
मलेरिया- ताप येणे, घाम येणे
डेंगी- ताप येणे, डोके दुखणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, हिरड्यांमधून रक्त येणे, सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, रक्त साकळण्याचे प्रकार, प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने कमी होते, डोळे लाल होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT