मुंबई

द्रोणागिरी, विमानतळासाठी नवे पोलिस ठाणे

CD

उरण, ता. १५ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त बंदर विभाग हद्दीतील पोलिस ठाण्यांची पुनर्रचना करण्यात येणार असून नवी मुंबई विमानतळ हे पोलिस ठाणे तयार करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उरण पोलिस ठाणे, मोरा सागरी पोलिस ठाणे आणि न्हावा-शेवा पोलिस ठाणे यांची पुनर्रचना करण्यात येणार असून द्रोणागिरी पोलिस ठाणे हे नवीन पोलिस ठाणे करण्यात येणार आहे. मोरा पोलिस ठाणे हे उरण पोलिस ठाण्यात विलीन करण्यात येणार आहे.
द्रोणागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उरण पूर्व भागातील सर्व गावे, चिर्लेपासून एनएच ३४८ महामार्गाच्या पूर्वेकडील गावे आणि भाग, नवघरपासून ते बोकडविरापर्यंतची गावे आणि द्रोणागिरी नोडचा भाग हा जोडला जाणार आहे; तर मोरा पोलिस ठाण्यातील सर्व गावे ही उरण पोलिस ठाण्याला जोडण्यात येणार असून करंजा, नवीन शेवा, मुळेखंड, चाणजे, डाऊरनगर आणि उरण शहर हा भाग उरण पोलिस ठाण्यात जोडला जाणार आहे. न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात जासई परिसरातील भाग समाविष्ट करण्यात येणार आहे. नव्याने होणाऱ्या विमानतळ हद्दीसाठी नवीन पोलिस ठाणे करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव गृहविभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम आणि काम करणाऱ्या मनुष्यबळाची तरतूद केली जाणार आहे. सध्या बंदर विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त हद्दीत उरण, न्हावा-शेवा, मोरा सागरी आणि उलवे ही चार पोलिस ठाणी कार्यरत आहेत.
------------------
महत्त्व वाढणार
पुनर्रचनेनंतर द्रोणागिरी पोलिस ठाण्याचे महत्त्व वाढणार आहे. त्याचप्रमाणे उरण पूर्व भागातील जनतेचा त्रासही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. उरण पोलिस ठाणे हे सध्या उरण शहरात आहे. येथे जाण्यासाठी अतिशय अरुंद रस्ते असल्याने नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या ठिकाणी मोठे वाहन जाऊ शकत नाही. हा त्रास कमी होणार आहे. याचा फायदा उरण पूर्व भागातील जनतेला होणार आहे.
-----------------------
द्रोणागिरी पोलिस ठाणे एक एकर जागेत
नवीन द्रोणागिरी पोलिस ठाणे हे फुंडे महाविद्यालयाच्या समोरच्या जागेत होणार आहे. या ठिकाणी एक एकरचा प्लॉट असून येथे पोलिस ठाण्याची एक इमारतसुद्धा आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील कोणत्याही पोलिस ठाण्याला एवढी जागा नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोधैर्य योजना काय आहे? सोलापूरमधील ९९ अत्याचार पीडित महिला, मुलींना १.११ कोटीचे ‘मनोधैर्य’; विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळते कायदेशीर मदत मोफत

Shashikant Shinde: जनतेमुळेच माझे अस्तित्व अबाधित: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सध्याच्या राजकारणाचा जनतेला किळस वाटताेय

Pune Municipal Elections 2025: प्रभागरचना २०१७ प्रमाणेच; महापालिका निवडणूक, प्रारूप रचना सरकारला सादर

परीक्षेसाठी १०७ केंद्रे अन्‌ भरारी पथके अवघी तीन! वर्गातील CCTV कागदावरच; २३ सप्टेंबरपासून परीक्षा, अभियांत्रिकीची परीक्षा ३१ ऑक्टोबरपासून

Mahadev Munde case: २१ महिन्यांनंतर महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला वेग; एसआयटी प्रमुख पंकज कुमावतांनी घटनास्थळाची केली पाहणी

SCROLL FOR NEXT