
कुडाळ : मी मोठा झालो, तर त्यांचे राजकीय अस्तित्व संपेल, या भीतीने मला जिल्ह्यात मोठा होऊ दिलं नाही, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला; परंतु जावळी आणि कोरेगावची जनता माझ्यासोबत ठाम असल्यामुळे मी माझे अस्तित्व टिकवू शकलो, वरचे नेते माझ्यासोबत नसले तरी खालची जनता माझ्यासोबत आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले.