वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात अनधिकृत बॅनरबाजी करून शहर विद्रूप करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूलदेखील बुडवला जात आहे. राजकीय नेते अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आघाडीवर असताना आता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने खासगी क्लासेस, तसेच शाळांनीदेखील प्रसिद्धीसाठी एक पाऊल पुढे टाकत अनधिकृत बॅनरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. याकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कानाडोळा करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाने अनधिकृतपणे बॅनरबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे; मात्र पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्यास पालिकेचे अतिक्रमण अधिकारी धजावत नाही. अनधिकृत बॅनर दिसल्यानंतरही महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूलदेखील बुडत आहे. राजकीय नेत्यांच्या अनधिकृत बॅनरसह आता खासगी क्लासेसनेदेखील एक पाऊल पुढे टाकत शहरात पालिकेची परवानगी न घेताच बेकायदा बॅनरबाजी केली जात आहे. यामुळे शहरांमध्ये विद्रूपीकरण होण्यास सुरुवात झाली आहे. पंधरवडा-महिनाभरदेखील हे बॅनर्स एकाच ठिकाणी लागून राहत आहेत. पालिकेकडून होत असणाऱ्या दुर्लक्षामुळे नवी मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. शहरात अनधिकृत बॅनरबाजी केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.