मुंबई

बेशिस्त वाहतुकीने मनस्ताप

CD

पंढरीनाथ कुंभार ः सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १६ : भिवंडी-ठाणे महामार्गाच्या आठपदरीचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावर बुलेट ट्रेनसाठीचा पूल, ओवळी गावातून येणारा पूल तसेच समृद्धी मार्गाचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे रोजचा प्रवास तापदायक झाला आहे.
भिवंडी ते ठाणेदरम्यान अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागतो. रांजणोली ते खारेगाव, ठाणे हा मार्ग सुरळीत होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. भिवंडीमार्गे ठाणे, मुंबई गाठायचे असल्यास ठाणे-भिवंडी महामार्ग व अंजूरफाटा ते कशेळी-कापूरबावडी महामार्गाशिवाय पर्याय नाही. या रस्त्यावरील पुलांचे काम सुरू आहे; पण अंजूरफाटा- कशेळी- कापूरबावडी या मार्गावर मोठ्या संख्येने असलेल्या गोदामांमुळे येथे लहान-मोठ्या अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. दुसरीकडे भिवंडी रोड रेल्वेस्थानकावरून कोपर येथे जाणाऱ्या दिवा-वसई आणि इतर रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या कमी असल्याने नोकरदारवर्गाचा रेल्वे प्रवासदेखील तापदायक झाला आहे.
---------------------------------------
वाहतूक विभागात अपुरे मनुष्यबळ
मुंबई-नाशिक महामार्गावरून विविध भागातून जड-अवजड वाहने येतात. अनेकजण बेशिस्तीने वाहने चालवतात. रस्त्याच्या डाव्या बाजूने अवजड वाहने जात असल्याने वाहतूक कोंडीत हलकी वाहने अडकून पडतात. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नारपोली वाहतूक पोलिस उपविभागासह कोनगाव वाहतूक पोलिस विभागाकडील असलेला कर्मचारी वर्ग अपुरा आहे.
---------------------------------------
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी
राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या अडकून पडल्याने त्यांच्या पूर्ण फेऱ्या होत नाही. अशीच अवस्था ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस वाहतुकीची आहे. या सरकारी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठीच्या बस वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत पोहोचत नसल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेत प्रवास करावा लागतो.
---------------------------------------
मेट्रोचे काम संथगतीने
भिवंडीतील नागरिकांसाठी मेट्रोची सुविधा स्थानिक नेत्यांच्या राजकारणात अडकली आहे. त्यामुळे धामणकर नाका ते कापूरबावडी हे काम अपूर्ण असल्याने हा प्रवास सुरू होण्यासाठी भिवंडीकरांना स्वप्न दाखविले जात आहे. त्यामुळे नोकरदार तरुणांनी दुचाकीने प्रवास सुरू केला. या मार्गावर सेवा रस्ते नसल्याने महामार्गावर अनेकांचे अपघात झाले आहेत.
-----------------------------------------
मुंबई-नाशिक महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावर पिंपळास, ओवळी, माणकोली, खारेगाव या भागात पुलाची आणि इतर मोठी कामे सुरू आहेत. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो.
- शरद ओहोळ, सहाय्यक पोलिस आयुक्त, भिवंडी वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT