मुंबई

जलतरण तलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील घणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव १५ मेपासून सुरू करण्यात आला आहे. मागील महिनाभरापासून सुरू झालेला जलतरण तलाव नागरिकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या जलतरण सुविधेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून दररोज सकाळी व सायंकाळी शेकडो नागरिक येथे पोहण्यासाठी गर्दी करीत आहेत. महिनाभरात जवळपास एक हजार ५२ जणांनी अर्ज केला आहे. त्यापैकी ५६२ जण नवखे पोहणे शिकण्यात यशस्वी झाले आहेत.
महापालिकेच्या घणसोली येथील जलतरण तलावामध्ये प्राथमिक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक जलक्रीडेचा आनंद लुटत आहेत. मागील एका महिन्यात जवळपास एक हजार ५२ जणांनी या जलतरण तलावात पोहण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी ५६२ जण नवखे जलतरण शिकण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात असून, शहरात अशा प्रकारची आरोग्यदायी व फिटनेससाठी उपयुक्त सुविधा मिळणे, ही आनंदाची बाब आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
-----------------
अत्यल्प दरात मासिक पास
महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या पुढाकारामुळे ही सुविधा सुरू झाली असून, सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते आठ या वेळेत तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे. प्रवेशासाठी अत्यल्प दरात मासिक पासची सुविधाही देण्यात आलेली आहे. महिलांसाठी विशेष बॅचदेखील सुरू करण्यात आली आहे.
------------------
प्रशिक्षित बचाव कर्मचारी
स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने तलाव व्यवस्थापन अत्यंत काटेकोर आहे. जलतरण तलाव परिसरात प्रशिक्षित बचाव कर्मचारी, प्राथमिक वैद्यकीय मदतीची सुविधा आणि स्वच्छ पाण्यासाठी नियमित क्लोरीनेशन प्रक्रिया केली जाते. या सुविधेमुळे सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव आरोग्य आणि आनंददायी जीवनशैलीचा एक नवा अध्याय ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

श्रेयस तळपदे-काजल अग्रवाल पहिल्यांदाच एकत्र, 'द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित; कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

Kharif Sowing Issue : पावसाअभावी कोपर्डे हवेली परिसरातील भात रोपे पिवळी; कराड उत्तर-पूर्व भागातील खरीप पेरण्या खोळंबल्या

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवालच्या हत्येविरोधात लोणावळ्यात कँडल मार्च

Sangli News: भाजप आमदारांच्या गाडीचा अपघात! दुचाकीची कारला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT