‘द जर्नी’ विशेष मैफलीचे आयोजन
रक्कम सीपीएएमार्फत गरजू कॅन्सर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, १५ ः प्रख्यात संगीतकार आर.डी. बर्मन यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘द जर्नी’ (एस.डी. बर्मन ते आर.डी. बर्मन) या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफल कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशन (CPAA) च्या मदतीसाठी आयोजित करण्यात येते. सुप्रसिद्ध गायक अमित कुमार आणि शैलजा सुब्रमणियन या मैफलीत सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम २८ जून सायंकाळी वांद्रे येथील रंग शारदा सभागृह येथे होणार आहे.
ही संगीतमय संध्याकाळ एस.डी. बर्मन आणि आर.डी. बर्मन यांच्या अजरामर संगीताची आठवण करून देणारी, मनाला स्पर्श करणारी असेल. या कार्यक्रमातून मिळणारी सर्व रक्कम सीपीएएमार्फत गरजू कॅन्सर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणार आहे.
कॅन्सर पेशंट्स ॲण्ड असोसिएशन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था मागील ५६ वर्षांपासून कॅन्सरविरोधी लढ्यात आघाडीवर आहे. संस्थेच्या एकत्रित दृष्टिकोनातून रुग्णांना निदान, उपचार, पुनर्वसन, औषधोपचार, पोषण, कृत्रिम अवयव, रुग्णवाहिका सुविधा अशा अनेक स्तरांवर मदत केली जाते.
सीपीएएसोबत काम करण्याचा मला अभिमान आहे. संगीत हे जनजागृतीचं प्रभावी माध्यम आहे, आणि या मैफलीच्या माध्यमातून आम्ही कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांना आशा आणि सन्मान देऊ इच्छितो, असे गायक अमित कुमार यांनी सांगितले.
तर, ही मैफल केवळ संगीतातील दिग्गजांना मानवंदना देणारी नाही, तर रुग्णांना उपचार पूर्ण करता यावेत यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.