मुंबई

नौदल करणार ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांचा अभ्यास

CD

नौदल करणार ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांचा अभ्यास


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देण्याबरोबरच मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढावा म्हणून एमनएमआरडीए मेट्रो, उड्डाण पूल, भुयारी मार्ग असे प्रकल्प उभारत आहे. त्याची नौदलाने दखल घेतली असून एमएमआरडीए उभारत असलेल्या विकास प्रकल्पांची आपल्याही अभियंत्यांना माहिती व्हावी, त्याच्या तांत्रिक बाबी जाणून घेण्यासाठी नौदलाचे अभियांते या प्रकल्पांचा अभ्यास करणार आहे. त्यासाठी नौदलाचे व्हाइस ॲडमिरल दीपककुमार गोस्वामी (महासंचालक) यांनी सोमवारी (ता.१६) एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी घेतली आहे.

एमएमआरडीए उभारत असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे मुंबईसह परिसरातील नागिरकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या पायाभूत प्रकल्पांचे स्वरूप, व्याप्ती आणि दूरदृष्टी याचा नौदलातील अभियंत्यांना अभ्यास करण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव ॲडमिरल दीपककुमार गोस्वामी यांनी एमएमआरडीएपुढे ठेवला आहे. त्याबाबत बोलतना एमएमआरडीएचे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी म्हणाले, ‘विविध क्षेत्रांतील ज्ञानाची देवाण-घेवाण देशनिर्मितीस अधिक बळकटी देतो. त्यामुळेच आता नौदलाचे अभियंते प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा अभ्यास करणार असून ही सकारात्मक बाब आहे.


एमएमआरडीए राबवत असलेले प्रकल्प
- ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क
- २०० किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते प्रकल्प
- ‘शून्य सेतू’ हा वैशिष्ट्यपूर्ण पूल
- १६,००० हून अधिक कुटुंबांचे एसआरए प्रकल्पांतर्गत पुनर्वसन
- मुंबईला एमएमआरशी जोडण्यासाठी उभारलेला ‘अटल सेतू’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी आज 'यलो अलर्ट'; अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT