मुंबई

गैरसोयीचे मानसरोवर रेल्वेस्थानक

CD

कामोठे, ता. १८ (बातमीदार) : हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वेस्थानकाला गैरसुविधांनी वेढले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातील अनियमित चालणारे इंडिकेटर, पाणपोईचे अशुद्ध पाणी, अपुऱ्या आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास त्रासदायक होत आहे.

पावसाळ्यात मानसरोवर रेल्वेस्थानकातील भुयारी मार्गात पाणी साचते. पंप लावून पाण्याचा उपसा करावा लागतो. प्लॅटफॉर्मवर छत गळतीचे प्रकार वारंवार होतात. प्रवाशांना गाडीमध्ये चढताना भिजायला होते. उन्हाळ्यात नादुरुस्त पंख्यामुळे प्रवाशांना उकाड्याचा त्रास जाणवतो. प्लॅटफॉर्मवरून रेल्वेत एकाच बाजूने प्रवेश करण्याची व्यवस्था आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची धावपळ होते. दोन्ही बाजूने सुविधा सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

सार्वजनिक स्वच्छतागृहाची साफसफाई व्यवस्थित केली जात नाही. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे महिला प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. स्थानक परिसरात पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी साहित्य पुरवठा करणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. स्थानक परिसरात पार्किंगची समस्या बिकट झाली आहे. रिक्षांव्यतिरिक्त चारचाकी वाहनांना रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक करताना अडचण होत आहे. वृद्ध, गरोदर व आजारी माणसांना नाईलाजाने स्थानकापर्यंत चालतच जावे लागत आहे.

रेल्वेस्थानकातून कामोठे, कळंबोली परिसरातील सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करतात. रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मची संख्या अपुरी असून अतिरिक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही. प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या पाणपोईची नियमित स्वच्छता केली जात नाही. अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका संभवत आहे. प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवर अनेकदा चुकीची माहिती देतात, अशावेळी प्रवाशांचा गोंधळ होतो. प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गर्दीच्या वेळी तिकीट खिडकीवर लांब रांगा लागतात. पावसाळ्यात भुयारी मार्गातील घाण पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागते. दूषित पाण्यामुळे रोगराईची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणी उपसा करणारी यंत्रणा तोकडी आहे.

रेल्वेस्थानक परिसरात दिव्यांची गैरसोय आहे. रात्रीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना अंधारातून जावे लागत आहे. चोरटे, मद्यपी, गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. रात्री कामावरून उशिरा येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधार पडल्यावर रेल्वेस्थानकाबाहेर प्रेमी युगुल अश्लील चाळे करतात. प्रवाशांना खजील झाल्यासारखे वाटत आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
-------------
मानसरोवर रेल्वेस्थानकातून कामोठे, कळंबोली परिसरातील लोक प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म वाढवण्याची आवश्यकता आहे. रेल्वेस्थानकातील गैरसोयी दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- अजित माने, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT