मुंबई

बालकांचे आरोग्य पालिकेची जबाबदारी

CD

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘अतिसार थांबवा’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत शहरात विविध आरोग्य उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊन साथ’ या घोषवाक्याखाली ही मोहीम राबवली जाणार आहे. लहान मुलांपासून नागरिकांपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व आणि जलशुष्कतेवरील उपायांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेंतर्गत ० ते ५ वयोगटातील अतिसारबाधित बालकांना आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ओआरएस पावडर व झिंकच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच, आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रांमधून ओआरएस घोळ तयार करण्याचे प्रात्यक्षिक, योग्य हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. नागरिकांना अतिसारासंदर्भात योग्य माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये ओआरएस कॉर्नर स्थापन केला जाणार आहे.
अतिसार मुख्यतः अशुद्ध पाणी, उघड्यावर शौच, हात न धुण्यामुळे होतो. त्यामुळे मोहिमेंतर्गत वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना उघड्यावर शौचास जाणे टाळण्याचे, पाणी उकळून किंवा क्लोरीन टाकूनच वापरण्याचे आवाहन केले आहे. अतिसाराच्या वेळी ओआरएस घोळ देणे शरीरातील द्रव आणि क्षार भरून काढण्यास उपयुक्त ठरते, झिंकच्या गोळ्या १४ दिवस दिल्यास पुनरावृत्तीचा धोका कमी होतो. या काळात बाळांना स्तनपान सुरू ठेवणे, हलका आहार देणे, तसेच स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

आरोग्य विभागाचे आवाहन
अतिसाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी केले आहे. अतिसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि सामुदायिक सहभागच सर्वात मोठे हत्यार आहेत. ही मोहीम केवळ आरोग्याची नव्हे, तर जबाबदार नागरिकत्त्वाची चळवळ आहे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिसारासारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वांत प्रभावी उपाय आहे. स्वच्छता, योग्य आहार आणि वेळेवर ओआरएस व झिंकचा वापर हे केवळ उपचार नव्हे, तर जीवन वाचवण्याचे साधन आहे. ‘अतिसार थांबवा’ मोहिमेच्या माध्यमातून घराघरांत आरोग्य पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरातील प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपावे, हीच अपेक्षा आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''पापाची हंडी आधीच फोडलीये, आता BMC मध्ये विकासाची हंडी लागेल अन् लोणी…; फडणवीस काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

Video: ''सरपंच खाली उतरा'', चिमुकल्यांचा दंगा; रस्त्यासाठी गाडीवर चिखलफेक

अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी! भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता' चित्रपटात दिसणार अनोखी प्रेमकहाणी

फेक सॅलरी स्लीपवर नोकरी मिळाली, पण काम येईना; बॉस तरुणीने बँक स्टेटमेंट मागताच...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT