मुंबई

मण्यार सापाचा मुरबाडमध्ये घरोबा

CD

मुरबाड, ता. १९ (वार्ताहर)ः पावसाळा सुरू झाला की रात्रीच्या वेळी निशाचर प्राण्यांचा वावर वाढतो. अशातच सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या मण्यार जातीचे साप मुरबाडमधील मानवी वस्तीमध्ये निवारा शोधत असल्याने सर्पदंशांची शक्यता वाढली आहे.
मुरबाड तालुक्यामध्ये मण्यारच्या विविध प्रजाती आढळतात. या सापाला कंडोर, कांडोरा, मण्यार अशा विविध नावांनी ओळखले जाते. या सापाचे डोके लहान असून तोंड चपटे असते. काळसर रंगाच्या या सापाच्या अंगावर सफेद रंगाचे पट्टे असतात. छोटे बेडूक, उंदीर, किडे, पाली, सरडे यांच्या शिकारीसाठी हा साप रात्रीचा निघतो. यामुळे रात्रीच्या वेळी भक्ष शोधत असताना उष्णतेचे ठिकाण म्हणून अनेकांच्या अंथरुणात घुसून बसतो. अनेकदा हा साप कानाची बाळी, बोटांच्या फटीमध्ये, पायांच्या बोटांवर तसेच टाचेच्या वरच्या भागाचा चावा घेण्याच्या खुणा आढळतात. त्यामुळे झोपेतच माणसाच्या शरीरात पसरलेले विष मेंदू, मज्जातंतूला बाधित करते. मण्यार घरातील एका मनुष्याला चावून थांबत नाही तर आजूबाजूच्या प्रत्येकावर हल्ला करतो. त्यामुळे अतिशय घातक तसेच रागीट सर्प म्हणूनदेखील त्याची ओळख आहे. त्यामुळे दंश झाल्यास तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल व्हावे, असे आवाहन टोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांनी केले आहे.
---------------------------------------
मृत्यूचे प्रमाण अधिक
मण्यारचे विष साप नाग-कोब्रा यांच्यापेक्षा अधिक जहाल असते. अडगळीच्या ठिकाणी दरवाजाच्या फटीत, विटांमध्ये तसेच बारीक जागांमध्ये हा साप राहू शकतो. त्यामुळे लहान असो वा मोठा त्याचे विषाचे प्रमाण १०० % घातक असते. या सापाचे दात अतिशय बारीक, तीक्ष्ण असल्याने दंश झालेली जागा लवकर समजून येत नाही. झोपेत दंश करीत असल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.
----------------------------------------
मुरबाड तालुक्यासह इतर ठिकाणी अनेक विषारी, बिनविषारी साप पकडून त्यांना जंगलामध्ये सोडले आहे. मण्यार साप चपळ असल्याने अधिक घातक आहे. त्यामुळे बचाव करणे हेच योग्य आहे.
- अनिल सकट, सर्पमित्र, मुरबाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजारात नुकसान होतंय? सुरक्षित परताव्यासाठी 'या' 6 योजनांमध्ये करा गुंतवणूक

ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचं निधन, निवृत्तीनंतर १० वर्षांनी केलेलं पुनरागमन

Latest Maharashtra News Updates : दादर परिसरात जन्माष्टमी उत्सवादरम्यान महिलांनी दहीहंडी फोडली

CM Nitish Kumar : '5 वर्षात एक कोटी तरुणांना देणार सरकारी नोकऱ्या'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

iPhone 16 Pro Discount : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 16 Pro मिळतोय 1 लाखाच्या आत, 'इतक्या' हजारांचा बंपर डिस्काउंट

SCROLL FOR NEXT