मुंबई

अलिबागमध्ये घे भरारी मार्गदर्शपर कार्यक्रम उत्साहात

CD

अलिबागमध्ये ‘घे भरारी’ मार्गदर्शपर कार्यक्रम उत्साहात
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) ः अलिबाग तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री समर्थ फाउंडेशन व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घे भरारी’ हा कार्यक्रम नुकताच मेघाचित्र मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या युवकांचा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी गुणवत्ता यादी ही तुम्ही मिळवलेल्या मार्कांची असते, मात्र व्यक्तिमत्त्व ही जीवनाची गुणवत्ता यादी आहे. याचा पुढील आयुष्यात कधीच विसर पडू देऊ नका, असा उपस्थिताना मोलाचा सल्ला दिला. सध्या पावसाचा हंगाम सुरू आहे. हा कालावधी म्हणजे बी-बीयाणे पेरण्याचा, रुजवण्याचा आणि बहरण्याचा ऋतू आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याचा योग समर्थ फाउंडेशनने साधल्याचेही दवणे यांनी स्पष्ट केले. समर्थ फाउंडेशनच्या संस्थापक ॲड. मनस्वी मोहिते यांनी दहावी-बारावीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे हा श्री समर्थ फाउंडेशनचा एकमेव उद्देश नाही, तर प्रवीण दवणे यांच्यासारख्या विचारवंतांचे विचार आजच्या पिढीला देणे हा त्यातील गाभा आहे. चांगले विचार, चांगले संस्कार विद्यार्थ्यांना होऊन माणसातले माणूसपण जपणारी आधुनिक पिढी घडवायची आहे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी कोएसोचे अध्यक्ष गौतम पाटील, ॲड. विलास नाईक यांच्यावतीने डाॅ. राजश्री नाईक, रमेश धनावडे, तपस्वी गोंधळी, हर्षद घरत, प्रो. प्रमोद वेळे यांच्यासह दहावी-बारावीत प्रावीण्य मिळवलेल्या १५० हून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT