नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : अज्ञात व्यक्तीच्या मेसेजला प्रतिसाद देणे खारघरमधील एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून दुबईतील ३० लाखांची लॉटरी लागल्याच्या बहाणा करून त्यांच्याकडून तब्बल ४५ लाख ७० हजार रुपये उकळले. विशेष म्हणजे सायबर टोळीने या ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीच्या रकमेवर डल्ला मारला आहे.
फसवणूक झालेले ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती खारघर सेक्टर २०मध्ये राहण्यास आहेत. एका खासगी कंपनीतून ते सेवानिवृत्त झाले असून, कंपनीकडून सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेवर त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. नोव्हेंबर २०२३मध्ये सायबर टोळीने ज्येष्ठ नागरिकाच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून पाच रुपयांच्या १०० नोटांच्या बदल्यात दोन कोटी ९८ लाख ५६ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानंतर सायबर टोळीतील सदस्यांनी त्यांना संपर्क साधून त्यांना रक्कम मिळण्यासाठी तीन लाख ७५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. अशाच पद्धतीने सायबर टोळीतील १४ व्यक्तींनी त्यांना संपर्क साधून वेगवेगळी रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांनी नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दोन महिन्यांत तब्बल आठ लाख ७० हजार रुपये पाठवून दिले.
-----------------
दुबईतील लॉटरीचे प्रलोभन
सायबर टोळीने त्यांना दुबई येथे ३० लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी त्यांना एक लाख रुपये शुल्क भरावी लागेल, असे सांगितले. ही रक्कम ज्येष्ठ नागरिकाने पाठवल्यानंतर सायबर टोळीतील इतर तीन सदस्यांनी त्यांना वेगवेगळी रक्कम पाठवण्यास भाग पाडले. या सायबर टोळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने ३७ लाख रुपये पाठवून दिले. दोन्ही प्रकारांत सायबर टोळीकडून वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून आणखी पैसे मागण्यात येऊ लागल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एनसीईआरपी पोर्टलवर तक्रार केली होती. त्यांनी १७ जूनला खारघर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.