स्थानकातील संथ गती कामाचा प्रवाशांना फटका
बदलापुरात महाविकास आघाडी आक्रमक
बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : रेल्वेस्थानकात सुरू असलेली विकासकामे अगदी संथ गतीने सुरू आहेत. यामुळे याचा मोठा त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. रेल्वेस्थानकावर छत नसल्याने भरपावसात प्रवाशांना भिजतच लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात पूर्वेकडील स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, काम लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरकते जिने, डेक, लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देताना रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गृहीत धरले आहे की काय, असा प्रश्न सध्या स्थानकातील विविध समस्यांकडे बघून निर्माण होत आहे. ही विकासकामे करताना स्थानकात मोठा बोजवारा उडाला आहे. त्यात स्थानकात फलाट क्रमांक १ आणि २ वर छत नसल्याने भरपावसात लोकलची वाट बघावी लागते. लोकल आल्यावर एका हातात छत्री पकडून गर्दीतून लोकलमध्ये चढण्याचा जीवघेणा स्टंट बदलापूरकरांना करावा लागत आहे. यात दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, यांच्या पुढाकाराने शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील, प्रिया गवळी, विजय वैद्य, स्वप्नील राजेशिर्के, प्रीतम वानखडे, पप्पू भोईर, वंदना भगत, सईद गाझी आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर रेल्वेस्थानकात भेट देत स्टेशन मास्तर धनश्री गोडे यांच्याकडे प्राथमिक स्तरावरील निवेदन सादर केले आहे. जोपर्यंत रेल्वेस्थानकातील कामे पूर्ण होत नाहीत, तोवर फलाट क्रमांक १ बंद करू नये, लोखंडी कुंपण घातले असून, काढून टाकावे, शेडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
रेल्वेस्थानकात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली कामे एकदम संथ गतीने होत आहेत. त्याला गती देऊन ही कामे तातडीने पूर्ण करावीत अन्यथा प्रवाशांच्या रोषाला रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल. महाविकास आघाडी यासाठी प्रवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
- अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.