मुंबई

घरेलू कामगार महिलांना छत्री वाटप

CD

घरेलू कामगार महिलांना छत्रीवाटप
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : शिवसेना ठाणकारपाडा विभागीय शाखेतर्फे घरेलू कामगार महिला, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांना छत्रीवाटप करत सन्मान करण्यात आला. शिवसेना उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले आणि शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे, माजी महापौर वैजयंती घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात नागरिकांना छत्रीवाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ यासारखे इतर अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या वेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटले की, शिवसेनेच्या वतीने पावसाळ्यात दोन कार्यक्रम ठरलेले असतात. यात विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक आणि घरेलू कामगार महिलांना छत्रीवाटप करण्यात येते. या वेळी शाखाप्रमुख नितीन कदम, उपशाखाप्रमुख उमेश भुजबळ, गणेश कुंभारकर, बाबू पांचाळ, जय पालेकर, दिवेकर काका, दीपक लासुरे, अभिजीत सुर्वे, संदीप पगारे, डिंपल घुगे, मनीषा बिन्नर आदींसह ठाणकरपाडा शाखेतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain News : पुढील पाच दिवस धोक्याचे, गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

Panchang 17 August 2025: आजच्या दिवशी श्री सूर्याय नमः मंत्राचा 108 जप करावा

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT