मुंबई

वाशी एनएमएमटी डेपोची रखडपट्टी

CD

वाशी एनएमएमटी डेपोची रखडपट्टी
प्रवाशांची गैरसोय; लवकरात लवकर उद्‌घाटन करण्याची मागणी
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशीत अत्‍याधुनिक एनएमएमटीचे बस आगार विकसित करण्यात आले आहे. मात्र उद्‌घाटनाअभावी या आगाराची रखडपट्टी सुरू आहे. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. सध्या प्रवाशांना डेपोबाहेर उभारलेल्या थांब्यांवरून बसचा प्रवास करावा लागत आहे.
वाशी डेपोची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या जागेचा योग्य वापर व्हावा, म्हणून महापालिकेने या ठिकाणी डेपोचे आधुनिकीकरण केले आहे. त्याआधी बरीच वर्षे अत्याधुनिक आगार विकसित करण्याचा विषय भिजत पडला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावले. वाशी बस स्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यास १५९ कोटी ८० लाख रुपये खर्चाला त्‍या वेळी महासभेने मंजुरी दिली होती. त्यानुसार या ठिकाणी कामाला सुरुवातही झाली. डेपोच्या वर २१ मजली व्यावसायिक वाणिज्य संकुल उभारण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आतील काही कामे शिल्लक होती, तीही पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या इतर मजल्यांवर वाणिज्य व व्यावसायिक कार्यालये उभारली आहेत. ती भाड्याने दिली जाणार आहेत. यातून परिवहन उपक्रमाला दरवर्षी ३३ कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या ठिकाणी जाहिरातींसाठीही योजना आखल्या गेल्या आहेत. तसेच खासगी वाहन पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र या वाणिज्य संकुलामध्ये असलेल्या बस डेपोचे अद्याप उद्‌घाटन न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्‍यामुळे लवकरात लवकर बस डेपोचे उद्‌घाटन करून ते प्रवाशांच्या सेवेत रुजू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
................
बस डेपोच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. उद्‌घाटन झाले की लगेच डेपो सुरू केला जाईल.
- योगेश कुडूस्कर, परिवहन व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं

SCROLL FOR NEXT