मुंबई

आषाढीसाठी पनवेल आगारातून १२ गाड्यांचे नियोजन

CD

नवीन पनवेल, ता. २५ (बातमीदार) : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. वारीत पायी जाणे ज्यांना शक्य नसते. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत तीन बसचे बुकिंग झाले आहे. पनवेल आगारातून १२ गाड्यांचे नियोजन ठरले आहे; मात्र भाविकांच्या मागणीनुसार बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पनवेल बसस्थानक प्रमुख डी. के. म्हात्रे यांनी दिली.
दरवर्षी पनवेलमधून हजारो भाविक विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात. अनेक जण खासगी वाहनाने; तर काही जण सार्वजनिक वाहनाने पंढरपूर गाठत असतात. खासगी वाहनातून जाणे अनेकदा खर्चिक असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी राज्य परिवहन महामंडळाकडून पंढरपूरला जाण्यासाठी जादा बसगाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षी मुंबई विभागातून ५५; तर रायगडच्या २५ बसची मदत होणार आहे. पनवेललगत ज्या गावातील भाविक ४२ पेक्षा जास्त असतील, अशा भाविकांची मागणी आली, तर त्याच गावातून थेट पंढरपूरसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT