मुंबई

रस्त्यांच्या दुरवस्थेवरून प्रशासन धारेवर

CD

भिवंडी, ता. २६ (वार्ताहर)ः शहर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भिवंडीकरांना वाहतूक कोंडीला वारंवार सामोरे जावे लागत असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, वाहनचालक सर्वच मेटाकुटीला आले आहेत. या प्रकाराबाबत शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत; पण कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज गगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दत्तू गीते यांना निवेदन दिले आहे. या वेळी पंधरा दिवसांत उपाययोजना करून खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी करण्यात आली असून शिवसेना स्टाइलने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वेळी शिवसेना पदाधिकारी राजू पातकर, ललित राऊत, विजय कुंभार, नितीन काठवले, शंकर खामकर, जमालुद्दीन मोमीन, मुजम्मील खान, शफीक अन्सारी, मंगल मुल्ला, आबीद सय्यद, रंजित नाईक, रमेश नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : नागपूरमध्ये RSS च्या विजयादशमी सोहळ्याला सुरुवात, सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन

माेठी बातमी! 'साेलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या बँकेत जमा होऊ लागले पैसे; नेमकी किती रुपये मदत मिळतेय..

Dussehra Decoration Tips: दसऱ्याला 'अशा' प्रकारे सजवा घर आणि कार्यालय, सर्वजण करतील कौतुक!

सरकारचा मोठा निर्णय! एक कोटींहून अधिक लाडक्या बहिणींची वाढली चिंता; स्वत:सह पती अन्‌ वडिलांचीही करावी लागणार ई-केवायसी; कशी करायची ई-केवायसी?, वाचा...

मोठी बातमी! सीना नदीची २०० किलोमीटर पूररेषा होणार निश्‍चित; पूराचा धोका टाळण्यासाठी सॅटेलाईटद्वारे सर्व्हे; रेड अन्‌ ब्ल्यू लाईन देणार यापुढे इशारा

SCROLL FOR NEXT