मुंबई

लोकशाहीच्या रक्षणासाठीचा ऐतिहासिक लढा पुन्हा उजळला

CD

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : २५ जून १९७५ मध्ये देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या निर्णयाने भारताच्या लोकशाहीवर मोठे संकट ओढावले होते. त्याच संकटात अनेकांनी सत्याग्रह केला. तुरुंगवास पत्करला आणि लोकशाही वाचवली. या ऐतिहासिक लढ्याच्या ५० वर्षांनंतर उल्हासनगर महापालिकेत हा संघर्ष नव्या पिढीपुढे विशेष चित्रफितीद्वारे सादर करण्यात आला.
भारताच्या लोकशाही इतिहासात अंधाराचे पर्व ठरलेली आणीबाणी जिची सुरुवात २५ जून १९७५ मध्ये झाली. त्या प्रसंगाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेत विशेष कार्यक्रम घेण्यात आले. उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींच्या संघर्षावर आधारित विशेष प्रबोधनात्मक चित्रफीत दाखवण्यात आली. ही चित्रफीत राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी उप-आयुक्त स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त व जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, सहाय्यक आयुक्त सलोनी निमकर, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी मार्गदर्शन करत सांगितले, ही चित्रफीत म्हणजे भारताच्या लोकशाही लढ्याची एक प्रेरणादायी झलक आहे. आपण सर्वांनी ती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, हे आपले कर्तव्य आहे. इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य सुरक्षित करता येत नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने एक अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक कार्यक्रम राबवून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर घडवून आणला आहे.

चित्रफितीतून उलगडले वास्तव
चित्रफितीत १९७५ ते १९७७ या काळात देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या कठीण परिस्थितीचे वास्तव मांडण्यात आले. अनेक सत्याग्रहींनी जे त्या काळात बंदिवासात होते त्यांनी त्या अनुभवांची साक्षात मांडणी केली. या काळात संविधान, नागरिक स्वातंत्र्य, माध्यमे आणि विरोधी पक्षांवर घातलेल्या निर्बंधांचा तपशील, तसेच लोकशाही पुनर्स्थापनेसाठी चालवलेल्या आंदोलनाचा इतिहास या चित्रफितीतून समोर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT