मुंबई

अमली पदार्थविरोधी दिन

CD

व्यसनाधीनतेऐवजी शिक्षणाची कास धरावी
पोलिस निरीक्षक किशोर साळे यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ

अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः व्यसनामुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते, कुटुंबाची वाताहत होते. तसेच समाजाची एकंदरीतच देशाच्या भवितव्याचे मोठे नुकसान होते. अमली पदार्थांचे सेवन केवळ शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडवत नाही, तर व्यसनाधीनतेतून गुन्हेगारीकडे वाटचाल होण्याची शक्यता वाढते. त्‍यामुळे अमली पदार्थांच्या सेवनापासून सर्वांनीच दूर राहून उच्च शिक्षणाची कास धरावी, असे मार्गदर्शन पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी विद्यार्थ्यांना केले.
अलिबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कोकण एज्‍युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ सेवन न करण्याची सामूहिक शपथ घेतली. तसेच प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रात्यक्षिक दाखवले. कार्यक्रमात ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवेबाबतही माहिती देण्यात आली. या सेवेचे महत्त्व समजावून देत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली.

---------------

रॅलीतून नशेपासून दूर राहण्याचे आवाहन

पेण (वार्ताहर) : शहरातील पोलिसांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत घेत अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढली होती. ‘व्यसनाच्या आहारी जाऊन शरीराची हानी करू नये, दारूची नशा करी शरीराची दुर्दशा’ असा घोषणा देत नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. या वेळी निरीक्षक संदीप बागुल यांनी, कोणतीही नशा हानिकारक असून, शरीराची दुर्दशा करते. यामुळे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होते. या वेळी काढलेल्‍या रॅलीमध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूल, नेने कन्या शाळा, सार्वजनिक विद्यामंदिर यांसह अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी पेण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक नीलेश रजपूत, विक्रम नवरखेडे, संतोष चव्हाण, उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर यांसह पोलिस कर्मचारी, शांतता समिती सदस्य आदी उपस्‍थित होते.

------

कर्जत पोलिसांकडून पदसंचलन
कर्जत (बातमीदार) ः रायगड जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने २० ते २६ जूनदरम्यान ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी सप्ताहा’निमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून कर्जत पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला देऊ नका थारा’, ‘दारू पळवा, गाव वाचवा’, ‘मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी’ अशा घोषणा देत फलक हातात घेऊन पोलिसांनी शहरात पदसंचलन केले.
रॅलीत नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. उपक्रमाद्वारे व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, तरुणांमध्ये जनजागृती करणे आणि अमली पदार्थांचे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. रॅलीचे नेतृत्व कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केले. त्यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक राहुल वरोटे आणि पोलिस ठाण्याचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. उपक्रमाचे नियोजन रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

---------

नेने महाविद्यालयात कार्यक्रम
पेण (बातमीदार) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विवेक भोपी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व हवालदार किशोर घरत, सीएफआयच्या कार्यक्रमाधिकारी अक्षता सावंत, महाविद्यालयाच्या डीएलएलचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. देविदास बामणे, संघर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. तुकाराम माळवे, डॉ. सुभाष लकडे, प्राध्यापक सायली पितळे, प्राध्यापक चाटू फळे व विविध शाखांचे प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य सदानंद धारप यांनी, हल्ली व्यसनामुळे तरुण पिढी ग्रासली असून, शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्‍याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रसाळ आणि विवेक गोपी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन तज्‍ज्ञाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुकाराम माळवे यांनी केले, तर आभार डॉ. देविदास बामणे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन भेटीतून काय निष्पन्न झाले? भारतासाठी आहे 'ही' गुड न्यूज

मोठी बातमी : Dewald Brevis ला नियमभंग करून ताफ्यात घेतले? R Ashwin च्या गौप्यस्फोटानंतर चेन्नई सुपर किंग्सचं स्पष्टीकरण

Wildlife Photography Career: निसर्गाचं जिवंत चित्र टिपायचंय? वाइल्डलाईफ फोटोग्राफीत करा करिअर!

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात

Jai Jawan Pathak: अनेक प्रयत्न कोसळले, पण अखेर उभा राहिला १० थरांचा इतिहास, कोकणनगरनंतर जय जवान पथकाची विजयी झेप!

SCROLL FOR NEXT