पाच वर्षांत २६ टक्क्यांपर्यंत दरकपात
७० टक्के घरगुती वीजग्राहकांना फायदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः राज्यातील घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक, कृषी अशा सर्व घटकांतील वीजग्राहकांच्या वीजदरात पुढील पाच वर्षांपर्यंत (२०२९-३०) दरवर्षी कपात होणार आहे. ही दरकपात येत्या १ जुलैपासून तातडीने लागू करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरमहा शंभर युनिट वापरणाऱ्या सर्वाधिक ७० टक्के घरगुती वीजग्राहकांच्या बिलात १० टक्के घट होणार असून, पाच वर्षांपर्यंत ही घट २६ टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयाचा घरगुती ग्राहकांसोबतच बळीराजालाही दिलासा मिळणार आहे.
महावितरणे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पंचवार्षिक वीजदर सादर केले होते. नियामक आयोगाने सर्व ग्राहकांसाठी वीजदर कपातीचा आदेश दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, येत्या १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महावितरणचे संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.
भविष्याची गरज लक्षात घेता, महावितरणने गेल्या दोन वर्षांत ४५ हजार मेगावॉट वीजखरेदी करार केले. त्यामध्ये सौर, पवन, बॅटरी स्टोरेज, पंप स्टोरेज अशा नवीकरण ऊर्जेचा वाटा ३६ हजार मेगावॉट आहे. त्यामुळे महावितरणला स्वस्तात वीज मिळणार आहे. आगामी पाच वर्षांत महावितरणचे वीजखरेदीचे ६६ हजार कोटी रुपये वाचणार आहेत. महावितरणच्या महसुलातील ८५ टक्के रक्कम वीजखरेदी आणि विजेचे वहन करण्यात खर्च होतो, अशी माहिती संचालक चंद्र यांनी दिली.
---
शेतकऱ्यांना दिलासा
सध्या कृषी वीजदर पाच रुपये ३६ पैसे प्रति युनिट आहे. पारंपरिक पद्धतीने तो १० रुपये २४ पैसे प्रति युनिट पोहोचला असता, पण आता पाच वर्षांच्या अखेरीस तो तीन रुपये ८३ पैसे प्रति युनिट असेल, अशी माहिती चंद्र यांनी दिली.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.