तारापूर, ता. २८ (बातमीदार) : पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसात चिल्हार-बोईसर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता असून, वाहनांचा वेग मंदावण्याबरोबर अपघातांत वाढ झाली आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या चिल्हार-बोईसर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. १५ किमी अंतराच्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एमआयडीसीकडून २०२१मध्ये या रस्त्याच्या १३ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. जवळपास १०० कोटींचा खर्च करून रस्ता आणि दुभाजकांची कामे करण्यात आली होती. पण या रस्त्यावरील खैरा पाडा, बेटेगाव, मान, वारांगडे, गुंदले, नागझरी नाका, लालोंडे, चरी, वेळगाव, खुटल आणि चिल्हार या गावांच्या हद्दीत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
-----------------------------------------------
३० ते ३५ हजार वाहने धावतात
तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून दररोज ३० ते ३५ हजार मालवाहू अवजड वाहने, दुचाकी, खासगी आणि प्रवासी वाहने नेहमी धावतात. पण मुकुट टंक पेट्रोल पंप, टाटा हाउसिंग, मान, गुंदले दोन बंगला, नागझरी नाका, वेळगाव येथील रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे खड्डे पडत आहेत. पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहेत.
----------------------------------
अपघातप्रवण जागांकडे दुर्लक्ष
- तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परिसरात लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बोईसरच्या पूर्वेला बेटेगाव, मान आणि वारांगडे भागात मोठ्या प्रमाणात नवीन रहिवासी संकुले उभी राहत आहेत. सोबतच सुपर मार्केट, शाळा, महाविद्यालये, फर्निचर दुकाने, वाहनांची विक्री दालने सुरू झाल्याने चिल्हार-बोईसर रस्त्यावर मालवाहू, खासगी तसेच प्रवासी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागामार्फत चिल्हार-बोईसर रस्त्यावरील अपघातप्रवण जागांची पाहणी करून एमआयाडीसीला तातडीच्या दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र एमआयडीसी, ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती आणि सुरक्षा उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.